पहिले प्रेम

Started by Sameer Nikam, October 15, 2012, 03:16:34 PM

Previous topic - Next topic

Sameer Nikam

शाळा भरती साडे बाराला
मी घर सोडत साडे अकराला
करी घाई  तिला एक नजर पाहायला
वाटे मज्जा तिची वाट अडवायला

तिला येता पाहून
फिरवी हाथ डोक्यावरून
तिचे लक्श वेधावे म्हणून
पण ती जाई अनोळखी समजून

करी रोज प्रार्थना देवाकडे
आज तरी तिने पाहावे माझ्याकडे
मग निघती माझी स्वारी शाळेकडे
ठेवूनिया देवापुढे  पाच नारळाचे तुकडे

आज पहिले तिने मला हसून
मी तर तितेच गेलो भारावून
पुढे गेली मैत्रिणीच्या कानात पुटपुटून
शाळेच्या मागे भेट असे सांगून

ठरलं होत शाळा सुटल्यावर भेटायचं
मी तर सुरु केले काम स्वप्न रंगवायच
मस्त हातात हात घालून फिरायचं
मात्र प्रत्यक्षात अवघड झाले  बोलायचं

काय बोलावे काही सुचेना
तिला लाजण्याविना काही येईना
बोलायला दोघेही प्रारंभ करेना
कंटाळून मैत्रीण म्हणाली काहीतरी बोलाना

मीच केली सुरवात बोलायला
लागलो माझ्याच बढाया मारायला
तीही लागली होती हसायला
मन लागले होते तिच्या खळीत बुडायला

लागलो होतो अधूनमधून भेटायला
खूप काही असे दोघांकडे बोलायला
कधी ती कधी मी जात घरी सोडायला
दोघेही लागले होते एकमेकात रुळायला

केली सुरवात पैसे जमवायला
तिला एक सुंदर गिफ्ट द्यायला
करी संकोच ती गिफ्ट घ्यायला
दिला नकार लाल गुलाबाला

त्या क्षणी आभाळ माझ्यावर कोसळले
तिने मैत्रीच्या नावाखाली गिफ्ट होते घेतले
पण तिला नाही कधी कळले
किती तुकडे तिने माझ्या हृदयाचे होते केले

वाटे मनाला तिने मला फसवले
मित्र म्हणुनी हाथ होते तिने धरले
मला नवते कधी ते  समजले
वाटले स्वःताला उगाच तिच्या प्रेमात होते पाडले

शेवटी पहिले प्रेम अर्धवट राहिले
नव्याने आता दुसऱ्यात शोधू लागले
पण अजूनही नाही कधी तिला विसरू शकले

समीर सु निकम
 

Vishal gadge

owsome!!, Arre dude pahil prem ardhavatch ka rahate?

Sameer Nikam

@vishal, mala hi nahi aaj pariyant kadhi kalale..still searching reason for the same... :)

santoshi.world

pahil prem ardhavatch rahate coz aplyala suruvatila je prem vatate te just ek attraction asate ... ani second time apan savadhgirine vicharpurvak prem karato mhanun may be te successfull hote :P ...