तरंगत होता क्षितिजावरती...

Started by Sadhanaa, October 17, 2012, 05:28:42 AM

Previous topic - Next topic

Sadhanaa

तरंगत होता क्षितिजावरती ...

तरंगत होता क्षितिजावरती
मेघ पांढरा एक इवलासा
रंग रूपे पाहून त्याची
मिळत होता मना दिलासा ।
लाल नारिंगी अन् कीरमिजी
रंग त्याचे बदलत होते
क्षणा क्षणाला आकारांतही
फरक त्याच्यात  होत होते ।
क्षणांत दिसली सखी त्यामधें
स्मित वदनाने अवतरलेली
अचानक बदलुनि रंग तयाचा
तीं अनुरागा मध्यें दिसली ।
रंगात लाल त्याच्या उमटली
रेखा लाजवंती प्रियत्तमेची
सुखावून मी पहात असतां
छटा उमटली निर्भयतेची ।
भारावुनी  मी पहात असता
रंग किरमिजी उमटून आला
बघता बघता तो मेघ छोटा
हवेंत अचानक विरून गेला ।।
रविंद्र बेंद्रे
ही चित्र-कविता स्वरुपात पहायची असल्यास कृपया येथे क्लिक करा .
Please Click on this
http://ravindrabendre.blogspot.com/2012/10/blog-post_16.html