वास्तविक ते एक स्वप्नच आहे

Started by Mandar Bapat, October 18, 2012, 03:33:57 PM

Previous topic - Next topic

Mandar Bapat

दरवळला  हा सुगंध,स्तब्ध झाला वारा
स्वप्न पुरे झाले,अन तुटला हृदयी तारा
आली हसत तू ,अल्लड हा भाव सारा
हातात हात तुझा,आनंदाला उरला ना पारा   

मी तर होतो माझा,तू पण  माझी झाली
सोबत अशी तुझी,एकटिक वजा झाली
विचाराच्या कचऱ्यात,तू आठवण साफ केली
इतिहासाच्या  चुका खोडत प्रेमगाथा रचली

नभी सूर्य तो,तुला सूर्य मानले
अंधारी आयुष्यात   ,डोळे   तू उघडले
कालपर्यंत वावरलो स्वप्नात,आज सत्य पाहिले
तुलाच पाहिले सदैव,बाकी पाहायचेच राहिले

प्रेम झाले आपले,आंधळे त्याला संबोधले
अमर अशा प्रेमात,वय आडवे आपले आले
दोघांच्या या  प्रेमात,मनपण  वैरी  झाले
सगळे वजा  झाले ,अंती प्रेम ते  बाकी राहिले

तूहि  दुर  निघून ,मला सोडून गेली 
आयुष्याच्या गुणाकाराची,शेवटी वजाबाकी झाली
बाकी उरलेली   स्वप्ने , मी हृदयी साठवली
अन रात्रीच्या काळोखानंतर  पुन्हा कोवळी पहाट झाली 

स्वप्न हि तरुण भासतात जणू सत्यच आहे
अनुभवानंतर  कळले कि वास्तविक ते एक स्वप्नच आहे
                                                                       
                                                           ---मंदार बापट