सवयच आहे तिला..!

Started by प्रशांत दादाराव शिंदे, October 19, 2012, 08:14:38 AM

Previous topic - Next topic
किती रागावते ती
खुप छळते ती

सवयच आहे तिला
माझ्याशी भांडण्याची

अन..

मला सवयच झाली
तिचे अश्रु पुसण्याची

कधी कधी ऐकतच नाही
सवयच आहे तिला हट्ट धरण्याची

गाल फुगवुन माझ्यावर रुसण्याची
प्रेम करते ती म्हणुनच तर
जाणवते मला तिच्या अधिकारांची...

रोजचेच झालंय आता
तिला माझ्याशी अबोला धरण्याची
मग माझा दाटलेला कंठ पाहुन
माफ कर ना जान म्हणण्याची....

प्रेमळ वेदना हया देऊन मजला
सवयच आहे तिला
त्यांना रोज कुरवाळायची...

© प्रशांत शिंदे
१९ / १० / १२