कळ्या - न फुललेल्या!

Started by केदार मेहेंदळे, October 19, 2012, 10:21:40 AM

Previous topic - Next topic

केदार मेहेंदळे

विक्रांत,   
तुझ्या 'जुना मित्र भेटला' ह्या कविते वरून सुचलेली हि कविता आहे. तुझा अभिप्राय अपेक्षित आहे. कविता आवडली नाही तरी सांग. मी डिलीट करीन.       

झाडाला खूप कळ्या असतात
पण सगळ्याच फुलतं नसतात
काही कळ्यांची फुलं होतात
काही तशाच गळून पडतात

गळून पडल्या तरी
कोमेजत नाहीत त्या
हे मात्र खरं कि कधी
फुलतं हि नाहीत त्या

हळू हळू मग त्या कळ्या
मातीत गाडल्या जातात
पाचोळ्याच्या ढिगा खाली
त्या विस्मृतीत जातात

अन अचानक कधी तरी
ती माती उकरली जाते
कळ्यांच्या स्पर्शानी अन गंधांनी
मन पुन्हा हळवे होऊन जाते

माहित असतं त्या काळ्या
उमलणार नाहीत कधी
कितीही वाटलं तरी त्यांची
फुलं होणार नाहीत कधी

माहित असतं बाहेर राहिल्या
तर काचा होतील त्याच्या
आपल्या बरोबरच इतरांना
जखमा होतील त्याच्या

म्हणून मग मना विरुध्ध त्यांना
मातीत परत गाढायला लागतं
फुलल्या नाहीत तरी सुरक्षित आहते
ह्यातच समाधान मानायला लागतं

कळ्या........
न फुललेल्या..........
मनात खोल गाढलेल्या...........
लपवून, जपून, सुरक्षित ठेवलेल्या......     


केदार....


विक्रांत

#2
प्रत्येकाच्या मनात काही कळ्या असतात .
काही  फुटल्या काचा असतात .
पुनःपुन्हा आनंद देत असतात
पुन:पुन्हा अंतर कापत असतात 

कधी कधी दु:ख असह्य होत
आनंदाने वा  मन गदगदत
काचा कळ्यांचे शब्द होतात
कवितेत येवून शांत करतात 

छान !