नीरभ्र आकाशात मी,टक लाऊन बघतो

Started by Mandar Bapat, October 19, 2012, 11:59:13 AM

Previous topic - Next topic

Mandar Bapat

नीरभ्र आकाशात मी,टक लाऊन बघतो
तारकांमध्ये कुठे तू दिसते का ते शोधतो
सापडली का फक्त तूला  न्याहाळत बसतो
मुळात अबोल मी तुझाशीच  बोलत राहतो
 
आठवतो  ते हसण नंतर  हळूच लाजण
विसरत नाही हृदय तुझ ते वागण
एका एका हास्यासाठी माझ ते जागण
अन  मिठीत न येण्याची तुझी ती कारण 

कळत नकळत आलेली मिठीत माझ्या तू
जणू तूझे  मन खेळत होते विचारांशी हुतुतू
स्वप्नही असे नव्हते ज्यात मी अन तू
झालो वर  मी अन माझी वधू तू   

हि मनाची कविता भगवंताला मान्य नव्हती
मला वाटत प्रेमासाठी त्याला तू हवी होती
गेली तू त्याचासवे मला न्यायची तुझी इच्छा नव्हती
त्यावेळेस पण तुझी सोबत माझा मनात  होती

म्हणून आजही वेळ मीळाला  कि वर बघतो
तुमच प्रेम मी उघड्या डोळ्याने अनुभवतो 
तू आजही शांत पण तो टीमटीमत असतो
मला बघताच तो तूला  मिठीत लपवतो 
म्हणूनच  तर  .............

नीरभ्र आकाशात मी,टक लाऊन बघतो
तारकांमध्ये कुठे तू दिसते का ते शोधतो
                               
                                    -------मंदार बापट

             
                                                           

Shweta G