अशी होती ती वेडी खट्याळ!

Started by amit5, October 19, 2012, 07:40:47 PM

Previous topic - Next topic

amit5

                                                                              अशी होती ती वेडी खट्याळ!

अशी होती ती वेडी खट्याळ ,
तिला  पाहता क्षणी झालो मी घायाळ ,
डोळ्यात तिच्या होती अनोखी चमक ,
केसांतही होती तिच्या हवी-हवीशी अशी महक,

बोलण्यातही तिच्या अशी जादू ,
अरे  मित्रांनो तुम्हाला काय सांगू ,
निख्खळ हसू तिचे चंद्राच्या कोरीप्रमाणे,
नयन तिचे जणू तार्यांप्रमाणे,
अशी होती ती वेडी खट्याळ ,
तिला  पाहता क्षणी झालो मी घायाळ

मजकडे बघून वेडी लाजायची ,
आणि विचारले तर फक्त  हसायची,
माझ्या मनातही तिच्याबद्दल होते काही,
पण सांगायची कधी हिम्मतच झाली  नाही,
अशी होती ती वेडी खट्याळ ,
तिला  पाहता क्षणी झालो मी घायाळ .......................
::) ::) ::) ::) ::) ::) ::) ::) ::) ::) ::) ::) ::)

तुमचाच
अमित माहोरे

केदार मेहेंदळे

अशी  होती  ती  वेडी  खट्याळ
तिला  पहाता  क्षणीच
झाला  तू  घायाळ
मिळाली  तुला  ती?
का करून  गेली  तुला  ती  घायाळ? :D