आठवण

Started by Tejas khachane, October 23, 2012, 03:03:14 PM

Previous topic - Next topic

Tejas khachane

शेवटचा क्षण जो तुझ्यासवे जावा
हृदयात तुझ्या फक्त मीच असावा
कामना माझी असलीही नाही
पण छोटासा किनारा ताटी माझ्या नावे असावा
स्वप्नी तुझा  चेहरा आणि मनी तुझाच ध्यास
भेटण्याची तुझी आता वाटतेय आस
विस्मरून क्षण जे तुझ्यासवे गेले
दुखातही चेहऱ्यावर स्मित हास्य आले
मधुर अशा शब्दांची तुझ्या आठवण जरी येते
निशब्द होऊन आसवांची धारा वाहू लागते
मन कासावीस होते आणि आठवण तुझी येते
त्याच विचारांनी मन गहिवरून जाते
समजावतो मनाला नको मोह असा धरू
पण नाही शकलो मी स्वताला सावरू
हे प्रेम आहे तुझे कि फक्त भास आहे मनाचा
पण मनी विचारही येत नाही तुझ्या वीना कुणाचा
आज पर्यंत कोळे हे न उमगले मजला
का म्हणून प्रेम करतो फक्त मी तुजला ????????????

sappubhai

Khupach Chhaan...
_____________________________________________________-
Swapnil     -    www.marathiboli.in