काव्य करित बसलो होतो...

Started by Sadhanaa, October 24, 2012, 07:01:48 AM

Previous topic - Next topic

Sadhanaa



काव्य करित बसलो होतो...

काव्य करित बसलो होतो नवे छंद जोडत होतो
नव्या नव्या पंक्तीन मध्ये यमक अखेर जोडत होतो ।
काव्य ते करीत असता श्रीमती समोर येऊन ठेपली
समोर तिला उभी पाहून  खय्यामची आठवण झाली ।
भांव काही सांगतेस कां  हंसत तिला मी विचारले
स्मित वदनाने तिने एकदां मजकडे निरखुन पाहिले ।
घ्या लिहून भराभर  काहीं भाव आठविले
श्रीमतीने म्हणताच असे  पेन-कागद उचलले ।
साखर आहे -- रुपये  रॉकेल ते --रुपया लिटर
बटाटे -- रुपया असून कापड -- रुपये मीटर ।
भाव ऐकुनी श्रीमतीचे थक्क होऊन मी बसलो
काव्य तो करण्याचा 'मूड ' गमावुन बसलो ।
सांगु कां भाव आणखी  श्रीमती विचारत होती
तो ऐकण्या पूर्वीच  मला चक्कर आली होती ।।

रविंद्र बेन्द्रे
ही चित्र-कविता स्वरुपात पहायची असल्यास कृपया येथे क्लिक करा .
Please Click on this
http://ravindrabendre.blogspot.com/2012/10/blog-post_5176.html


केदार मेहेंदळे


विक्रांत