एक एक धागा आठवणीचा

Started by Mandar Bapat, October 24, 2012, 11:38:50 AM

Previous topic - Next topic

Mandar Bapat

असंख्य  प्रश्नाने  ग्रस्त  मी
कुठे असा  गुरफटलो मी
एक एक धागा  आठवणीचा
विणत  पुढे जगतोय मी !!!!!

रोज खिडकीतून   तेच किरन कोवळे
संगे खेळाया मज बोलवे
तिथे  खगही पाखरान संगे 
मज  पिलाप्रमाणे  खेळवे !!!!!

पाऊस   तो सुरेख बरसे
त्यास इंद्रधनुष्य घाली वळसे
वाटे लटकुनी  त्या वेला
उंच उडी घ्याया जीव तरसे !!!!

रात्र मखमली पांघरी चादर निळी
ओढून मी ती  मिठीत आवळी
चिडून  मग चंद्र तारे त्वेषाने   
अंती माझा कानही पिळी!!!!!

आजही  न कळे मजला कोणाचे कोण
तो चंद्र कोण,पाऊस अन ती रात्र कोण
बस शिकलो मी इथे आता
मी इथे कोणाचा अन माझे आता कोण कोण !!!!

असंख्य  प्रश्नाने  ग्रस्त  मी
कुठे असा  गुरफटलो मी
एक एक धागा  आठवणीचा
विणत  पुढे जगतोय मी !!!!!


 
                                        .........मंदार  बापट




Sagar Deshmukh



monica

chan khup aawdli...

असंख्य  प्रश्नाने  ग्रस्त  मी
कुठे असा  गुरफटलो मी
एक एक धागा  आठवणीचा
विणत  पुढे जगतोय मी !!!!!