परके झाले ते सारे क्षण..

Started by किरण पवार, October 24, 2012, 05:24:13 PM

Previous topic - Next topic

किरण पवार

परके झाले ते क्षण..

निसटून गेली ती वेळ
जी कधी तुझा मिठीत गेली होती,
हसते आता रात्र मला
जी कधी तुझा सहवासाने धुंद झाली होती..

का छळतो हा उनाड वारा
दिसत नाही का त्याला मी जळताना..
जो चंद्र होता आपल्या प्रेमाचा साक्षी,
तो ही दिसे आज हळहळताना..

कदाचित तू दिलेल्या प्रेमाचा शपथा
त्याने ही चोरून पहिल्या असतील..
वाळूत उमटलेल्या आपल्या पाऊल खुणा
अजूनही तशाच राहिल्या असतील..

तुझा तोंडावर वाऱ्याने उडणारे केस
कोण आता सरळ करत असेल..
कोण फिरवेल तुझा गालावरून हात,
अन कोण तुझा साठी झुरत असेल..

हरवली ती संध्याकाळ
अन हरवले ते सुंदर नाते..
परके झाले ते सारे क्षण..
जे कधी फक्त माझे होते..





-किरण पवार
http://kiranpawar0108.wordpress.com/

मनात आलेले कागदावर खूप वेळा उतरले ..
पण कागदावरचे वर इथे उतरण्याचा हा पहिलाच प्रयत्न..



केदार मेहेंदळे



कवि - विजय सुर्यवंशी.




प्रशांत नागरगोजे

badiya....khup mast kavita. keep writing and posting...... :)