दोघेचं सहलीला...ii

Started by Sameer Nikam, October 26, 2012, 01:38:25 PM

Previous topic - Next topic

Sameer Nikam

निघालो आपण दोघेचं सहलीला 
बिनधास्त घेवूनीया बाईक अलिबागला

होते ते दिवस थंडगार ग्रीष्मातले
आपण दोघेही होतो त्यात गारठलेले

झोळी होती अडकवली  तुझ्या पाठीला
होतो आनंद लुटत मी तुझ्या मिठीतला

चालवली बाईक मी भरधाव वेगाने
घट्ट मिठी मारुनिया तू बसावे या आशेने

डोलत होती पाती गवताची वाऱ्याने
गाती गाणी प्रेमाचे तू त्यात मोठ्याने

झाली होती आठवण बालपणाची
येती मज्जा येत्या जात्या लोकांना चिडवण्याची

नाही जाणवला थकवा प्रवासाचा
होता साथ एकमेकांच्या सहवासाचा 

वाटे आलो स्वर्गात तिथे पोह्चुनी
झालो उन्मंत समुद्रावर फेरी मारुनी

झालो होतो थक्क तुला पाहुनी
होती चिंब भिजलेली तू समुद्राच्या पाण्यानी

नसानसातून वीज माझ्या वाहत होती
जेव्हा चांदरात तू माझ्या जवळ येत होती

हृदयाचे ठोके वाढूनी श्वास मोठे घेत होतो
जेव्हा तू माझ्यात आणि मी तुझ्यात गुंतत होतो   

चेहरा  दोघांचाहि होता पडलेला
वेळ भरकन होता गेलेला

निघता निघेना पाय इथून
वाटे राहावे इथेच सारे विसरून

अविस्मरणीय ठरली  ती सहल
ठेविले आठवणी जपुनिया जवळ


समीर सु निकम