उंदीर मामा

Started by केदार मेहेंदळे, October 26, 2012, 04:03:45 PM

Previous topic - Next topic

केदार मेहेंदळे

उंदीर मामा उंदीर मामा
धीटूकले  तुम्ही छान
इवले इवले पाय तुमचे
पिटुकले तुमचे कान

बाप्पाशी आहे गट्टी तुमची
त्यांचा  मोदक खाता तुम्ही
ऐकून निरोप भक्तांचे तुमचे

दुखत नाहीत का कान?

गणपती चे वहान तुम्ही
त्यांना घेऊन फिरता तुम्ही
उचलून त्यांचा भार तुमची
दुखत नाही का पाठ?

दुखत असेल पाठ तुमची
या एकदा आमच्या घरी
घेऊन लाटण आई तुमची
शेकून देईल पाठ
   :D   



केदार....   

Madhura Kulkarni

यमक घेण्याचा प्रयत्न केला असता तर अजून उठाव आला असता कवितेला, अस मला वाटत.....बाकी शेवटचा विनोद आवडला.

swara

khup cute aahe kavita.........
mastach..... :)  :)

shashaank

वा, केदार,  छानच बालगीत लिहिलेस की, सुरेखच...