महागाई

Started by Vaibhav patade, October 26, 2012, 08:13:12 PM

Previous topic - Next topic

Vaibhav patade

:-[
महागाईचा बकासुर,
पैसा खात आहे...
गरिब उपाशि श्रिमंत तुपाशि,
देव पण सारं ऊघड्या डोळ्यानी पहात आहे....
जिवण महाग होत आहे...
जिवण महाग होत आहे....

बिन साखरेचा चहा,
आता रोज पदरी पडणार...
गोड बोलुन गोडवा वाढवावा,
साखर पण आता नाही परवडणार....
सारा पगार आता साखरेवर जात आहे...
जिवण महाग होत आहे...
जिवण महाग होत आहे....

तुर मुग मसुर डाळ,
फक्त नावे राहणार...
पाण्याशिवाय आमटिमध्ये,
काही नाही दिसणार....
डाळ पण हल्ली भाव खात आहे...
जिवण महाग होत आहे...
जिवण महाग होत आहे....

पुन्हा एकदा आता कबुतर पाळाव,
गर्लफ्रेंडशी बोलण फोनवर टाळाव....
फोन बिल मध्ये दोन चंद्र येतिल,
सागांयच काम केल ज्याच त्याला कळाव...
काँल रेट पण आता सहण नाही होत आहे...
जिवण महाग होत आहे...
जिवण महाग होत आहे....

गाडी आता फक्त,
स्वप्नामध्ये फिरवायची...
स्वप्नात सार फुकट असतं,
हवी तेवढी चालवायची...
पेट्रोल पण म्हणे आकाश चुबंत आहे...
जिवण महाग होत आहे...
जिवण महाग होत आहे....

गरीबाला आता कोणि वाली नाही,
शेतकर्याच्या आत्महत्येची गिनतीच नाही...
सरकार फक्त नावालाच,
जनतेची त्यांना पडलिच नाही...
जिवन पण आता वळसा घेत आहे...
जिवण महाग होत नाही
मरण जवळ येत आहे...
मरण जवळ येत आहे...
वैभव पत्ताडे
4.08.012

केदार मेहेंदळे



Vaibhav patade


Eknath Palvankar


Amey Sawant

superb....chan rekhatli....(y)