प्रेम प्रेम म्हणून आम्ही...

Started by Sadhanaa, October 27, 2012, 07:34:03 AM

Previous topic - Next topic

Sadhanaa

प्रेम प्रेम म्हणून आम्ही...

प्रेम प्रेम म्हणून आम्ही
         एकमेका पाठी लागतो
सुख सुख म्हणून आम्ही
         न कळत ते भोगत असतो ।

सुख असते चार क्षणाचे
         अनंत काळ  दुःखी जातो
काळजी जवाबदारीच्या
          भाराखाली वाकून जातो ।

दिसते हे सत्य परि
           प्रेमाचा ना सोस सुटतो
कारण त्या एका विकाराने
            बुद्धिभ्रंश झाला असतो ।।

रविंद्र बेन्द्रे
ही चित्र-कविता स्वरुपात पहायची असल्यास कृपया येथे क्लिक करा .
Please Click on this
http://ravindrabendre.blogspot.com/2012/10/blog-post_26.html