" त्यानं प्रेम केलं किंवा तिनं प्रेम केलं "

Started by कवि - विजय सुर्यवंशी., October 27, 2012, 10:41:25 AM

Previous topic - Next topic

कवि - विजय सुर्यवंशी.

" त्यानं प्रेम केलं किंवा तिनं प्रेम केलं "

त्यानं प्रेम केलं,
किंवा तिनं प्रेम केलं...
करू दे कि माला सांगा,
तुमचं का्य गेलं .....

तो तिला एकांतात,
बागेमध्ये  भेटला ..
अनं नको तितकं जवळ जाउन खेटला...
लाल लाल गुलाबाचं फुल होउन पेटला...

भेटला तर भेटू दे की ... पतला तर पेटू दे की....
तुमचं डोकं इतकं कशासाठी गरम झालं .....

एकदा ती त्याच्यासाठी वेडीपिशी झाली..
पाउस होता तरीही,
भिजत त्याच्या घरी गेली...

घरात तेंव्हा कुणीच नव्हतं ,
म्हणून याचं फावलं ...
त्यानं तिला जवळ घेउन,
चक्क दार लावलं....

लावलं तर लावु दे की ... फावलं तर फावु दे की ...
तुमच्या आमच्या पुर्वजानी आणखी का्य केलं........

घरात जागा नसते तर ,
चालणारच TAXIT  प्रकरण ...
ते थोडीच बसणार आहेत...
पानिनिच घोकित व्याकरण....

गुलाबी थंडीचे परिणाम हे होणारच ...
कुणीतरी कुणाला जवळ ओढून घेनारच.....

घेतलं तर घेऊ दे की ... व्ह्यायच ते होऊ दे की ...
तुमच्या घरचं बोचकं त्याने थोडीच उचलून नेलं ....

कानटोपी घातलीत म्हणून ,
फुलं काय फुलणार नाहित ...
तुमच्या रुद्राक्षान्ना घेउन ,
पाखरं काय झुल्नार नाहित ...

फुलली तर फुलू दे की ... झुलली तर झुलू दे की ....
खिडकीतुन  फुकट बघता तर आलं ........

त्यानं प्रेम केलं किंवा तिनं प्रेम केलं,
करू दे कि माला सांगा तुमचं का्य गेलं


                          ....... कवी -- UNKNOWN