।। कृषीवल ।।

Started by श्रीमति प्रतिभा गुजराथी, October 28, 2012, 07:27:23 AM

Previous topic - Next topic
।। कृषीवल ।।
भारतभूचा मी कृषीवल
झालो कसा अगतिक हतबल
कुणा सांगु मी माझी तळमळ
सोसवेना आता अंतरीचा छळ
वाटे रूसला वरुण राजा
भोगतो मी ही कसली सजा
भकास झाली काळी आई
आकाशाला भिडली महागाई
बी पेरुनी झाली माती
फिरली पुरती दैव-गति
विनाश काळी विपरत मती
कर्जाचा डोगर डोईवरती
कधी अवर्षण कधी अतीवर्षण
कधी उपोषण कधी कुपोषण
निसर्ग झाला लहरी दुश्मन
भवीष्य उद्याचे दिसते भीषण
घेवूनि अर्ज विनंत्यांचा भार
फिरतो वणवण दारोदार
मोडकळीस आला माझा संसार
विचार करूनी झालो बेजार
चहू बाजूंनी गांजलौ पुरता
होईल यातून कधी मुक्तता
नकोच कुणाची भीक फुकाची
चिरनिद्रा  ती घ्यावी सुखाची
- श्रीमती प्रतीभा गुजराथी

केदार मेहेंदळे

वाटे रसला वरण राजा, दैव-गित, कजारचा डोगर ......

shbd correct kara... kavita chan aahe.