मातीतून जन्मलेले सारे ...

Started by Sadhanaa, October 29, 2012, 08:39:24 AM

Previous topic - Next topic

Sadhanaa

मातीतून जन्मलेले सारे ...

दिवस रात्रीच्या पायाने  काळ पुढे जात आहे                                     
क्षणाक्षणाला वर्तमान  भूतात विलीन होत आहे ।
वेलीवरचे सुंदर फुल  दिमाख तो मिरवीत आहे
परंतु काळाच्या चालीने  निर्माल्य तें बनणार आहे ।
पहाटे पडलेला दवं बिंदू  मोत्यासारखा चमकत आहे
पण सूर्योदय होताच तो  हवेंत विरून जाणार आहे ।
तारा तेजस्वी आकाशीचा  तेजोमय दिसत आहे
काळाच्या ओघाबरोबर  उल्का होऊन जाणार आहे ।
तारुण्याच्या कैफात मानव  वार्धक्याला विसरत आहे
म्हणून तो मी अन् माझे  याचा टेंभा मिरवीत आहे ।
आजची रात्र उद्याचा दिवस  हें अंधराचेच रूप आहे
काळाच्या उदरांत सारेच  गडप होऊन जाणार आहे ।
कोण टिकला काळापुढे  सृष्टीच सारी क्षणिक आहे
मातीतून जन्मलेले सारे मातीत मिळून जाणार आहे ।।                                 

ही चित्र-कविता स्वरुपात पहायची असल्यास कृपया येथे क्लिक करा .
Please Click on this
http://ravindrabendre.blogspot.com/2012/10/blog-post_28.html

केदार मेहेंदळे


विक्रांत

आवडली ,सर्व क्षणिकम  सर्व अनित्यम.