जखमा

Started by Madhura Kulkarni, October 31, 2012, 12:03:22 PM

Previous topic - Next topic

Madhura Kulkarni

भरलेल्या जखमा
उकलल्या कोणी
पुन्हा घेरून टाकती
जुन्या आठवणी

मग फाटते आभाळ
दुभंगते धरणी
वारा बेभान वाहतो
कोमेजते रातराणी

दुखा:त भिजुनिया
बेसूर झाली गाणी
कठीन आता जिणे
इथे क्षणोक्षणी

वाढते दुख: माझे
जेव्हा पाहतो अंगणी
असते पान फुल पण
नसते साजणी

केदार मेहेंदळे


Madhura Kulkarni


santoshi.world


Madhura Kulkarni

संतोषी,
धन्यवाद!

kuldeep p

डोंगरात उगम झाला जरी

नागमोडी वळणातून प्रवास झाला तरी

नदीचे महत्व कमी होत नसते

दुखाच्या रस्त्यातून गेल्याशिवाय

जीवनाच्या प्रवासाला मजा येत नसते

नागमोडी वळणांना कंटाळायचे नसते

सुखाप्रमाणे दुखः ही हसत जगायचे असते


Keep Smiling  :)

मिलिंद कुंभारे

मधुरा
खूपच छान!

प्रत्येक काळोख्या  रात्रीनंतर;
फुललेली एक पहाट नक्कीच उगवते!

मिलिंद कुंभारे  :) :) :) :) :) :) :) :) :) :) :) :)

Madhura Kulkarni

प्राजदीप, मिलिंद,
धन्यवाद!
रिप्लाय आवडले मला.