मी कोण आहे ...

Started by Sadhanaa, November 02, 2012, 07:27:45 AM

Previous topic - Next topic

Sadhanaa

मी कोण आहे  ...

मी कोण आहे काय आहे
माझे मलाच ठाऊक नाहीं
मित्र तसेच शत्रूकडून ही
त्याचा बोध होत नाहीं ।
मित्र नुसती स्तुती करतात
शत्रू तसेच दूर रहातात
            त्यामुळेंच स्वदोष दिसत नाहीं ।
दोष असे वाढत जातात
गूण मात्र कमी होतात
         त्याची जाणीव स्वताःस  होत नाहीं ।
नीति  तशीच अनितीची
चांगले तसेच वाईटाची
           पारख आपणांस करता येत नाहीं ।
दोष हा आहे कुणाचा
समाजाचा किं स्वतःचा
               त्याचीच कल्पना मज  येत नाहीं  ।।


रविंद्र बेन्द्रे

ही चित्र-कविता स्वरुपात पहायची असल्यास कृपया येथे क्लिक करा .
Please Click on this
http://ravindrabendre.blogspot.com/2012/11/blog-post.html

केदार मेहेंदळे

#1
मी कोण आहे? काय आहे?
आयुष्य भर शोध चालू आहे
कोहम...? कोहम...? कोहम...?
उत्तर ह्याचेच शोधायचे आहे.   

कधी मित्रा कडून, कधी शत्रू कडून
कधी समाजा कडून, कधी स्वताहा कडून
नीती अनीती, चांगले वाईट
गुणदोष जाणून घ्यायचे आहेत