शेवटी मी तर एक बुजगावण आहे.......

Started by Mandar Bapat, November 02, 2012, 12:11:18 PM

Previous topic - Next topic

Mandar Bapat

शेवटी मी तर एक बुजगावण  आहे.......

अंगावर  कापड अन डोक्यावर मडक फुटके
हाथ बाजूला  ताठ  तर पाय  हवेत लटके
कुत्र्याला पण मान मी तर सदैव अपमानीत आहे
अंगावर कपडे असूनही मी  नंगा आहे..
माझा नशिबी फक्त दिवसरात्र  राबण आहे
कारण शेवटी मी तर एक बुजगावण  आहे....

उन्हा तानात ताठ मानेने उभा  असतो मी
पाऊसात किडेकीटकांचा आडोसा मी
रोजच कीटकनाशके अन रंगीत फवारे पीत  आहे 
जो  सहन करतो त्याला मारण्याचीच इथे रीत आहे
माझा नशिबी फक्त दिवसरात्र  राबण आहे
कारण शेवटी मी तर एक बुजगावण  आहे....

धान्य  पिके कणसे माझासोबत डोलतात असे
मीच त्यांचा सखा  अन जणू सोबती जसे
मी तर मालकाच्या प्रेमापासून लांबच आहे
अन त्याचा कुत्र्यासाठी  तर मी खांबच  आहे
माझा नशिबी फक्त दिवसरात्र  राबण आहे
कारण शेवटी मी तर एक बुजगावण  आहे....

पोळ्याचा  दिवस तर बैलासाठी पण खास   आहे
आपल  म्हणावे मला  बस इतकीच आस आहे
हाडामासाचा नाही पण मानलेला माणूस आहे
मला पण कौतुकाची थोडी हाऊस आहे
पण माझा  तर नशिबी फक्त दिवसरात्र  राबण आहे
कारण शेवटी मी तर एक बुजगावण  आहे....

                                     .....मंदार बापट

केदार मेहेंदळे

#1
bujgavnyaachi paristhiti chan rangavali aahet. pan mala vatat 'माझा नशिबी फक्त दिवसरात्र  राबण आहे' chyaa aivaji ''माझा नशिबी फक्त दिवसरात्र  ubh rahaan आहे ' as hav ka?

Mandar Bapat

chalal ast pn tyala manus mhnun tulna keli tr 'राबण' jast appropriate watle..

tse pn karu shaklo asto...thanks :)

infact tse krel pn me...:)




Sagar Deshmukh

me pan ek bujgawne ahe :(
chan kawita...mazashi compare keli kawita....khup chan :)