कधी ह्या हृदयाचे ऐकुन घे ना....!

Started by प्रशांत दादाराव शिंदे, November 02, 2012, 04:43:47 PM

Previous topic - Next topic
शब्द  बोलतात  ते कळतं सार्यांना

शब्द  ते बोलतात  हृदयाशी

पण  कधी  पाहिलंस  का

डोळ्यांना ही काही सांगायचे  असतं

मनातले गुपित  तुझ्यापाशी उघडायचं असतं ....

तू मात्र  तशीच रागावतेस अन  रुसतेस

माझ्या रागाला नेहमीच अशांतताच भेटते

तूला  मात्र माझ्याजवळ  मन मोकळे करता येतं

पण माझे  हृदयाचे  कधी ऐकलस का

त्याला हि  तुझ्याजवळ काही ऐकवायचं असतं ...

कधी  ह्या  हृदयाचे ऐकुन घे ना...
-
© प्रशांत शिंदे(¯`v´¯)
`•.¸.•´ ... ¸.•°*"˜˜"*°•. 
` `... ¸.•°*"˜˜"*°•.
...`© प्रशांत शिंदे