तिच्याचसाठी हे अश्रू ढाळतो…………

Started by tanmay20, November 03, 2012, 03:52:23 PM

Previous topic - Next topic

tanmay20

रोज संध्याकाळी घरातून दिशाहीन निघतो
समुद्रकिनारी निरर्थ येऊन बसतो
पायाचा अंगठा हि मखमली वाळूत , नकळत तुझंच नाव कोरतो
पण थबकणारी प्रत्येक लाट ते पुसत हाच प्रश्न विचारते
तुला प्रेमात वेडं करून जी निघून गेली , तिच्याचसाठी का तू हे अश्रू ढाळतो ???

हळूहळू सूर्यही क्षितिजावर कलंडतो
मग नकळत डोळे मिटत तुझ्याच आठवणीत रमतो
मनात तुझ्याच विचारांचा कल्लोळ माजतो
पण भानावर आणत , सूर्याची शेवटची किरणही जाता जाता हाच प्रश्न विचारते
सात जन्माचं वचन देऊन जी निघून गेली , तिच्याचसाठी का तू हे अश्रू ढाळतो ???

हळूहळू आकाशात चंद्रही आपली जागा घेतो
गुलाबी थंडीत , अख्खं आसमंत बहरतो
तुझ्यासोबतचा प्रत्येक क्षण डोळ्यासमोर उभा ठाकतो
व प्रश्न विचारू पाहणाऱ्या अंधाऱ्या रात्रीला मीच उत्तर देतो
हो , मला जगणं शिकवून जी हे जग सोडून गेली , तिच्याचसाठी मी हे अश्रू ढाळतो

                                                                                          ....................तन्मय सिंगासने


प्रशांत नागरगोजे

shevatachi ool vachatach angavar sahare ubhe rahatat....exellent. nad khula kavita..... :)


केदार मेहेंदळे

#4
chan kavita... unexpected end