।। अजन्म ।।

Started by श्रीमति प्रतिभा गुजराथी, November 05, 2012, 12:37:52 PM

Previous topic - Next topic
।। अजन्म ।।

हे दुःख प्राक्तनाचे
सोसता सोसवेना
ही हाक आर्त माझी
का कुणास कळेना

मीशाप की वरदान
न कळेच विधात्याला
जन्मण्या आधीच भोगते
नरकातल्या यातनेला

माताच होते वैरिणी
सांगु कसे कुणाला
कन्या नको म्हणूनि
खुडविते अंकुराला

धोका हरघडी असे हा
माझ्याच अस्तित्वाला
नाकारता का हो तुम्ही
शिंपल्यातल्या मौक्तिकाला

               - श्रीमति प्रतिभा गुजराथी

केदार मेहेंदळे


विक्रांत

mala kavitechi lay aani geyta aavadli. virah kavitetil soor vatatat chhan