।। सांज सावळी ।।

Started by श्रीमति प्रतिभा गुजराथी, November 05, 2012, 01:59:21 PM

Previous topic - Next topic
।। सांज सावळी ।।

सांज – सावळी राजस बाळी
लाल गुलाली सिंदुर भाळी
लेवूनि आली उन्हे कोवळी
शामल तनूवर किरण झळाळी ।१।

अधोवदना ही तर बावरी
लज्जेने का पदर सावरी
खांद्यावरती शाल भरजरी
चम-चम करती काठ जरतारी ।२।

इन्द्रधनूची कमान झाली
हळूच भूवर उतरू लागली
सप्तरंगात पावले भिजली
गालांवरती अवखळ लाली ।३।

अवगुंठनातून नाजूक हसली
कटिमेखलेची सर ऒघळली
नभांगणात विखरुन पडली
दीपकळ्यांतून फुले उमलली ।४।

               - श्रीमति प्रतिभा गुजराथी

केदार मेहेंदळे


shashaank


विक्रांत