।। वादळ ।।

Started by श्रीमति प्रतिभा गुजराथी, November 05, 2012, 02:11:33 PM

Previous topic - Next topic
।। वादळ ।।
ते वादळ पेल्यामधले
शमले तेव्हां जरी
आवर्त होवूनि भिरभिरते
अजूनि ते अंतरी

तू दिधलीस मधु-वचने
मिथ्या असती जरी
झालीत निर्माल्य सुमनापरि
तरी जपली मी आजवरि

पिऊन मदिरा वेदनांची
धुंदीत का चालले मी
अंतरात होऊनि निखारा
ती जळजळते अंतर्यामी

झालीत शकले ह्रदयाची
विखूरलीत ठायी ठायी
तूडविलीस तू पायी पायी
झालास तेव्हां का निर्दयी

केलाच नाही अपराध काही
मी साहीले सर्व काही
भोगते सजा कशाची
केव्हांच कळले नाही

झालासे होम जीवनाचा
समिधा नुरल्या काही
तो वन्ही प्राक्तनाचा
धूमसतो अजूनही
               - श्रीमति प्रतिभा गुजराथी

केदार मेहेंदळे