तू...

Started by sachin_sawant, November 05, 2012, 02:52:29 PM

Previous topic - Next topic

sachin_sawant

मनी झंकारलेली सतार तू
कटकटींवरचा उतार तू

शरदातील चांद्ण तू
भिरभिरत्या मनातील कोंदण तू

सुंदर भावविश्व तरल तू
नागमोडी वळणानंतरची वाट सरळ तू

स्वच्छ निरभ्र आकाश तू
गु्लाबी थंडीतला कोवळा सूर्यप्रकाश तू

पाखरू होऊन बेभानपणे डोलू
लावणारे सूर तू
मौनातही बोलू लावणारे शब्द तू

केदार मेहेंदळे


sachin_sawant