प्रवास

Started by sachin_sawant, November 05, 2012, 03:14:17 PM

Previous topic - Next topic

sachin_sawant


माणुसकीचा जकात भरुन
त्याच रस्त्याने कितीदा चालायचे?
खाच-खळगे चुकवीत
त्याच प्रवासाशी कितीदा बोलायचे?
ओळखीचे थांबे अन सरावाची वळणे
रेंगाळलेला शिणवटा तरी का सक्तीचे पळणे?

अल्याड गावची वाट अनवट खुणावते
तिथल्या भर्राट वार्यशी यारी करावी किती वाटते
अनोळखी पोरक्या रानफुलांशी बहरत हरवावे
खोल दडलेल्या जिप्सी समवेत स्वतः शोधाया
अनोख्या प्रवासा निघावे

केदार मेहेंदळे

#1
अनवट वाटेवर अनोळखी फुलं
मनातली जिप्सी अन भन्नाट वारं
अशा प्रवासाची आसं लागते 
जातात पळून रेंगाळलेले शीणवटे

chan kavita..