विचारायचं तुला आज...

Started by Shrikant R. Deshmane, November 05, 2012, 07:07:46 PM

Previous topic - Next topic

Shrikant R. Deshmane

विचारायचं तुला आज,
माझ्या मैत्रीच्या  बंधनाला,
आज तू तोडशील का ?
मैत्रीची सीमा झुगारून,
पुढच पाऊल ठेवशील का?

खूप सारी मस्ती अन,
खूप सारे रुसवे,
माझे हे मन मात्र,
मलाच आता का फसवे...

नाही म्हटलीस तरी,
दोघांमध्ये आहे तितकीच ओढ,
मग करुयाना प्रेमाच्या नात्याची,
सुरवात अशी गोड...

पूर्वीचा आठवत बसलो कि,
हसायला येत मला,
कारण मी तुझ्यावर प्रेम करतो हे,
सांगू नाही तुला...

आतापरेंत प्रेमासाठी वाटत होता,
मैत्रीचा आधार घेऊन तुला छळाव,
आजही मी तुझ्यावरच प्रेम करतो,
हे कुठून तरी तुला कळाव...

असं म्हणतात,प्रेम हे आंधळ असत,
हे खरच असतं ,
तुझ्या प्रेमात पडल्यापासून,
माझा फोन होईल का व्यस्त...

किती दिवस चालू ठेऊ मी,
लपाछपी चा हा खेळ,
आतातरी होऊदे आपल्या,
दोघांच्या प्रेमाचा हा मेळ...

तुला याबद्दल सांगता येत नाहीये,
असा सोडशील का हट्ट,
आता मी तुला प्रपोज करतोय,
हो म्हणून प्रेमाचं नातं कर आपलं घट्ट...

                                                              .....श्रीकांत राजेंद्रकुमार देशमाने.
श्रीकांत रा. देशमाने.

[ कविता म्हणजे कागद,
लेखणी अन् तू... ]

nishigandha

realy masst gret yarrrrrrrrr its ossum  :)dil ko chu gaya :(