सकाळ

Started by sachin_sawant, November 06, 2012, 08:45:03 AM

Previous topic - Next topic

sachin_sawant

शुभ्र कापसी धुक्यांत
काळोख विरघळे
स्वागता स्निग्ध पहाटेचे
प्राजक्त ओघळे
पेंगुळल्या झाडांच्या पानांशी
कुजुबुजे मंद वारा
रात्रभर देवूनि पहारा
दूर आकाशा विझे तारा
स्पश्रात दवबिंदूच्या
मोहरली फ़ुले पाकळ्यांत
साठवुनी गारवा ह्र्द्यात
पक्शी आळविती किलबिलाट
ललित रागात
जाग्या झाल्या दिशा जागे झाले जन
पळाया आपापल्या जगात
चिरतरुण सकाळ हसली
कोवळ्या सोनेरी किरणांच्या अतूट नात्यात

केदार मेहेंदळे

chan varnan.... chan kavita