मी असा

Started by kaivalypethkar, November 06, 2012, 02:55:42 PM

Previous topic - Next topic

kaivalypethkar

मी कसा रे....मी असा रे
मीच सारे.....माझेच सारे
मीच पाऊस.....मीच धारा
मी सागर....मी किनारा
सहा ऋतूंचा ध्यास मी
अन धरेचा श्वास मी
गीत मी.....संगीत
मीनिरेसही जळणारातो दैवी राग मी
आकाश मी...पाताळ मी
मीच वेळ....मीच काळ...
मर्म मी ....धर्म मी
अर्थ मी.....तर्क मी
ईश्वराने वान्दिलेल्या
त्या कुळाचा अर्क मी..
मीच वारा...मी शहरा
स्वर्गासही माझा पहारा
शब्द मी....जाण मी
भान मी बेभान मी
प्रतिभेची खाण मी
कुबेराने याचीलेले तेजसी
दान मी.....
वेद मी....पुराण मी
शस्त्र मी शास्त्र मी
शक्ती मी......अस्त्र मी.
खंड मी....अखंड मी
कवेत हे ब्रम्हांड माझ्या
प्रचंड मी प्रचंड मी प्रचंड मी.....

विक्रांत

गीतेतील विश्व रूप दर्शन नुकतेच कुठे वाचले का?