प्रेम असतं की नसतं

Started by SANJAY M NIKUMBH, November 06, 2012, 10:35:07 PM

Previous topic - Next topic

SANJAY M NIKUMBH

प्रेम असतं की नसतं 

प्रेम असतं की नसतं
या वादाला
मला उत्तर द्यायचंय
खरंच प्रेम असतं
आज या जगाला
मला सांगायचंय
उगीच ज्याचा अनुभव नाही
ते अस्तित्वातच नाही
हे कुणी कसं म्हणू शकतं
प्रेम बीम काही नाही
फक्त आकर्षण असतं
हे कसं सांगू  शकतं 
लाखो प्रेम कविता  उतरल्या
कवींच्या लेखणीतून
पण ते शब्द अनुभवाशिवाय येत नाही
कुणाच्याही लेखणीतून
मी अनुभवतोय अजूनही
प्रेमातलं बेधुंद जगणं
प्रेम हि भावना
श्वासा इतकीच खरी एवढंच माझं सांगण
खोट वाटत असेल तर
माझ्या प्रेमकविता पहा
प्रेमाची प्रत्येक भावना गुंफलीय
तो शब्द न शब्द पहा
शेकड्याने कविता केल्या
न करतोच आहे
मी फक्त प्रेमावर
पण ती भावना संपत नाही
पुन्हा नविन शब्द उमलतात
माझ्या ओठांवर
एका सामान्य कुवतीच्या माणसाला
कुठून भेटले हे शब्द
कां झालात तुम्ही आता निशब्द
मला कां वेड लागलंय कां
इतकं प्रेमावर लिहायला
पण ती सतत सोबत असते
मला शब्द पुरवायला
प्रेम निरागस न निरपेक्ष असेलं
तरचं या भावना कळतात
पण या भावना
फक्त खऱ्या प्रेमाला भेटतात
हे प्रेमचं माणसाला
कवी बनवतं
मनातल्या भावनांना
प्रिये पर्यंत पोहचवत .

                                  संजय एम निकुंभ , वसई
                                दि. ३०.१०.१२ वेळ : ७.५० स.
                                     {मीरा रोड बसमध्ये }
]

nishigandha

he khare ahe but ajchya mulana prem manje timepasss vatto ani kahi mulana atraction raly khup chan kartos tu kavita he kavita he khup chan ahe i like it ,lovely prem he fakt khare prem karnarayla samjel