पर्जन्य..New Video...

Started by Sadhanaa, November 09, 2012, 01:01:06 AM

Previous topic - Next topic

Sadhanaa


पर्जन्य

शुभ्र पांढर्या मेघा तू तरी
जाउनी स्वर्ग नगरीला
एकांतातील मम हाल पाहुनि
कथन कर माझ्या सजणीला|

सांग जाउनी झडकरी तिजला
कहाणी माझ्या जीवनाची
सांग सखा तव वाट पाही
फ़क्त अखेरच्या मीलनाची |

नको ढाळूस तुचं अश्रुं
पाहुनि हे दुःख माझे
हसेलं ती मुक्त मनाने
बघुनी हे अश्रुं तुझे |

दु:खी जरी असे मी इकडे
परि सखी असावी सुखातं
म्हणुनी तिजला सुख देई
गोंजारून अपुल्या पर्जन्यात ।। रविंद्र बेन्द्रे

Please click here to watch
http://ravindrabendre.blogspot.com/2012/11/new-video.html