पाठलाग

Started by jitendra_sarode, November 09, 2012, 02:08:25 PM

Previous topic - Next topic

jitendra_sarode

पाठलाग   
तु सर्वप्रथम जेव्हा दिसलीस ,
तेव्हा मला वेगळ काहीतरी जाणवल
तुझ्या साध्या-सालस रुपाने ...........
माझ्या मनाला काहीतरी खुणवल.
त्या  खुणेतूनच
तुझा पाठलाग सुरु झाला ..........
माझ्या वाहित शेवटच्या पानावर
तुझा अकृतिबंध आकाराला आला.
                 त्या रेखारुपच्या वेणित ...
                 कधी कधी मी फुले माळायचो
                 कधी तुझ्या मोकळ्या केसात
                 माझ्या जिवाला गुन्तवायचो
                 बघ मी तुझा किती पाठलाग करायचो
कधीतरी सायकल तु बरोबरीत आणायची
थोड थांबवून सलास पणे  माझी वही मागायची
वहीच्या पानापानातुन मी तुलाच न्याहाळायचो 
बघ मी   तुझा किती पाठलाग करायचो...........
                 तुझ्या धन्यवादाने मी किती धन्य व्हायचो
                 परत केल्या वाहित प्रितीचे कोरे शब्द बघायचो
                 पुन्हा कधीतरी मागशील म्हणून वही खुप जपायचो
                 बघ मी तुझा किती पाठलाग करायचो....................
एकदा तुझी मैत्रींण  म्हणाली
तु मुद्दाम माझ्याशी अशी वागते
लागत नसतानाही उगाच माझी वही मागते
खरच का ?  तु पण माझा पाठलाग करते !
तुझ्या मनातले कळावे म्हणून ,
तुझ्या मैत्रिणीशी सलगी करायचो
बघ मी  तुझा किती पाठलाग करायचो....................
                     परीक्षेला तुझ्यापासून किती दूर असायचो
                     निकालात मात्र तुझ्या नंतरचा नंबर मिलवायचो
                     बघ मी तुझा किती पाठलाग करायचो....................
तुलाही सर्व हवे हवे होते.........
तुझ्याही मनात प्रेमाचे थवे होते
तुझ्या-माझ्या प्रेमात चोरट्या भेटी नव्हत्या
खरया-खोट्या आणा - भाका
कुणाच्याही ओठी नव्हत्या
होता फक्त पाठलाग .......................
तु माझा केलेला... मी  तुझा केलेला...
होता फक्त पाठलाग ................पाठलाग.
     
                                           --- जितु सरोदे

Bhushan Ahirrao


केदार मेहेंदळे

छान  कविता..... छान  पाठलाग