मला कां नाही जमत

Started by SANJAY M NIKUMBH, November 11, 2012, 05:25:43 AM

Previous topic - Next topic

SANJAY M NIKUMBH

मला कां नाही जमत

मला कां नाही जमत
लोकांसारख वागणं
फक्त कामापुरता
गोड गोड बोलणं
काम झाल्यावर
सहज विसरून जाण
कां उपकार केले कां
वरून असं बोलणं
मदत हवी असतांना
हात पाया जोडणं
न मिळाल्यावर
हाता पाया पडायला लावणं
जरी कोणी केले उपकार
तरी ऋणात न रहाणं
कृतज्ञता सोडून
कृतघ्न होऊन जाण
मला कां नाही जमत
असं शहाण्यासारख वागणं
स्वतःच्या हातानं दु:खी करतो
मी माझं जगणं .

संजय एम निकुंभ , वसई
दि. ५.११.१२ वेळ : ९.०० स.


केदार मेहेंदळे



Dayanand Mathapati