सणवार

Started by SANJAY M NIKUMBH, November 11, 2012, 05:30:59 AM

Previous topic - Next topic

SANJAY M NIKUMBH

अरे परमेश्वरा
कसली दिवाळी न कसला दसरा
आता सगळे सणवार विसरा
न घरातच बसून हातपाय पसरा
सिनेमाची तिकीटही इतकी झालीत महाग
की टीव्हीचा रिमोटच सर्फिंग करा
हॉटेलही महागलीत त्यावर व्हयाट आलाय
त्यापेक्षा घरात बसून काहीतरी करा
वाटत सुटी आहे म्हणून बाहेर फिरावस
पण प्रवासही महागलाय घरातच झकमारा
गेले ते दिवस सुखाचे अन सणवाराचे
दिवाळीच्या सुट्टीत सिनेमाला जायचे
शेजारी पाजारी जाऊन मस्त फराळ करायचा
कुणाकडेही गेलं तरी फक्कड चहा भेटायचा
किती आपुलकी होती तेव्हा प्रत्येकाच्या मनात
आता कुणाकडे गेलं तर वाटतं आलोय वनात
या महागाईन पुरतं कंबरड मोडून टाकलंय
माणसा माणसातलं प्रेम नष्ट करून टाकलंय
आता फक्त शिव्या घाला या सरकारा
अरे परमेश्वरा
कसली दिवाळी न कसला दसरा .

संजय एम निकुंभ , वसई
दि. ३१.१०.१२

केदार मेहेंदळे

सत्य परिस्थिती