वा रे सरकार तुझा चक्कर!

Started by केदार मेहेंदळे, November 12, 2012, 04:08:56 PM

Previous topic - Next topic

केदार मेहेंदळे

 अस म्हणतात कि त्रास अन दुख्ख अति झालं कि त्याचं विडंबन होतं आणि मग हसायला येतं. ज्याचं मासिक उत्पन्न रुपये १ लाखां पेक्षा कमी आहे अश्यां साठी सरकारने ९ सिलेंडर सब्सिडाइज रेट मधे  द्यायचा घेतलेला निर्णयहि असाच गरिबीचं विडंबन करणारा आहे. त्या वरून सुचलेली हि विडंबन कविता.   


वा रे सरकार तुझा चक्कर
महागड धान्य आणि स्वस्त सिलेंडर
महागाईत स्वैपाकाचे झालेयत वांदे .   
सरकार देतंय  ९ सिलेंडर

महाग भाजी, महाग तेल
रिकामे डबे, भरलेले सिलेंडर
महागडी वीज महाग पेट्रोल
रिकामे खिसे अन ९ सिलेंडर

महागाईत ह्या रिकाम्या पोटी
उचलू कसे भरलेले सिलेंडर
द्यावी खिचडी  एक वेळची
नको आम्हाला ९ सिलेंडर

रिकाम्या पोटीच मारायचे जर
तरी घेऊयात ९ सिलेंडर
मेल्या नंतर स्वताहाला जाळायला
कामी येतील स्वस्त सिलेंडर



केदार...



vijay ADAK

वा रे सरकार तुझा चक्कर
महागड धान्य आणि स्वस्त सिलेंडर
महागाईत स्वैपाकाचे झालेयत वांदे .   
सरकार देतंय  ९ सिलेंडर

महाग भाजी, महाग तेल
रिकामे डबे, भरलेले सिलेंडर
महागडी वीज महाग पेट्रोल
रिकामे खिसे अन ९ सिलेंडर

महागाईत ह्या रिकाम्या पोटी
उचलू कसे भरलेले सिलेंडर
द्यावी खिचडी  एक वेळची
नको आम्हाला ९ सिलेंडर

रिकाम्या पोटीच मारायचे जर
तरी घेऊयात ९ सिलेंडर
मेल्या नंतर स्वताहाला जाळायला
कामी येतील स्वस्त सिलेंडर


vijay adak ...

GANESH911



sweetsunita66

 छान !ज्वलंत प्रश्नावर बोट ठेवलं !!!वा रे सरकार तुझा चक्कर
                                        महागड धान्य आणि स्वस्त सिलेंडर ,......

                               मला सुचलेल्या दोन ओळी ,पहा जुळतात का ...,
  घरी खळगे भरण्यास नसे  दाणा ,
तरीही म्हणतोस मस्त कलंदर ,......सुनिता