गझल

Started by Madhura Kulkarni, February 03, 2013, 02:35:17 PM

Previous topic - Next topic

केदार मेहेंदळे

madhura ji,

hi gajhal kharach chann aahe. khaas karun pratyek dusryaa olital shevatch akshr "ळ" asan hi kharach kathin gosht aahe.

tumhi gajhal che niyam sangitalet. mala farak kalat nahi. tumhi sangitalya var samajal. pan khup kathin aahe. aani malaa vatat gajhal mhantal kay an kavita mhnatl kay... saundary kami hot naahi..

kavita/ gajhal khup avadali..... kharach chan aahe..

savita V


प्रसाद पासे

तुमची गझल आवडली....फार सुरेख शब्द रचना आहे...

पण काफिया आणि रदीफ आपल्या गझलेत दिसत नाही.

संदर्भ :

"तुज बघता सारा हिशेब चुकला होता
मी अमावास्येला चंद्र पाहिला होता

तो एकच झाला गुलाब अवघा लाल
जो ओठांवरती तुझ्या टेकला होता

तालात नादली तुझी पैंजणे तिकडे
हृदयाचा ठोका इकडे हुकला होता

डोळ्यात अचानक उभ्या जळाच्या लाटा
मी डाव प्रीतीचा पहिला शिकला होता

निथळता चांदणे असह्य अंगावरती
मी चंद्र तुझ्या वस्त्राने टिपला होता

तू मिठीत घेता श्वास थांबले होते
मज मारायचा डाव चांगला होता

पाहिले जयाने तुझे लाजरे हासू
माणूस तो आयुष्यातून उठला होता

चढणार होते जहर तुला हे माझे
मी कवितेतून दंश ठेवला होता"

वरील संदीपच्या गझलेत 'चुकला' 'पाहिला' 'टेकला' 'चांगला' 'ठेवला' ह्याला "काफिया" म्हणतात आणि मतल्यात ते दोनदा आले आहेत. काफियाचे अनेकवचन "कवाफी" आहे. "होता" जो शब्द आहे त्याला "रदीफ" म्हणतात जो मतल्यात दोनदा आला आहे आणि प्रत्येक शेरामध्ये शेवटी आले आहे. रदीफ हे पूर्ण गझलेत कधीही बदलत नाही.
मतल्यात गझलेची जमीन(मात्रा) निश्चित होते आणि ती पूर्ण गझलेत कधीही बदलत नाही. प्रत्येक काफियाचे "अलामत" सुद्धा निश्चित असते जसे कि वरील गझलेत  'उठला' 'ठेवला' 'चांगला' 'टिपला' हे काफिया आहेत त्यात प्रत्येक काफियाचा शेवट हा "ला" हे यमक आहे. "ला" च्याआधी "अ" हे स्वरचिन्ह आहे(अलामत म्हणजेच स्वरचिन्ह होय).
बाकी लघु आणि गुरु ह्या मात्रा आपणास ठाऊकच आहे.
पुलेशु

mkamat007

फार सुरेख...

Madhura Kulkarni

केदार मेहेंदळे, savita V, mkamat007 तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार.

Madhura Kulkarni

प्रसाद पासे,
सर, तुमच खर आहे. पण 'रदीफ' आणि 'काफिया' नसलेली गझलच नसते, अस म्हणण फारस योग्य ठरणार नाही.
'मात्रा' च्या आधारावरही गझल होऊ शकते, अस माझ आणि काही अजुन जाणकारांच मत आहे.
असो, गझल वाचून प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद!

मिलिंद कुंभारे

वाळवंट हे जीवन माझे जिथे बहरता वृक्षहि नसतो
जिथे तिथे मग दिसतो मृगजळ, क्षणात सारे होते निर्जळ

खूप छान गझल आहे!!

मधुर ताई! गझल किंवा कविता कशी लिहावी,त्याचे नियम काय आहेत ह्याची माहिती देणारी कुठली website  किंवा वेब लिंक आहे का? तुम्ही हे गझल लिहिणे कुठे & कसे शिकलात? मलाही थोडे मार्गदर्शन करा कि? मी कविता लिहिताना असला काहीच विचार करत नाही! काही तरी मनात येतंय अन मी लिहून जातोय! पण खरच ते काव्य असतं का हेही तपासायला हवं! तुम्ही गझल ह्या प्रकाराबद्दल सविस्तर थोडक्यात सांगितलय पण सगळंच डोक्यावरून गेलं!!

Madhura Kulkarni

Hmmm.....
पहिल्यांदा माझी गझल वाचून दाद दिल्या बद्दल मनपूर्वक आभार.

मिलिंद दादा,

ज्या प्रमाणे कवितेला यमक असण्याचा नियम असतो, तसच गझलेला 'मात्रे'चा नियम असतो.
शब्दांतील अक्षरांचा प्रकार ओळखून त्याच प्रकारच्या अक्षरांची मांडली दुसऱ्या ओळीत  करायची.

यात अक्षराचे प्रकार दोन....

१) लघु - म्हणजे काना-मात्रा, उकार-अनुस्वार नसलेली अक्षरे.....
           उदा: अ, ब, क, ड
आणि पहिली वेलांटी , पहिला उकार असलेली अक्षरे.
           उदा: हि, तु

२) गुरु - कान -मात्रा, दुसरा उकार, दुसरी वेलांटी असलेली अक्षरे...
           उदा: तू, जी, मी
आणि जोडाक्षरे....
           उदा: स्वास्थ्य

rudra

kaparacha deh maza,virah agnit jale....
hrudayachya at mazhya, ek shubhra kamalanche tale....

rudra

hahahahahahahahahahahaah.........