गझल

Started by Madhura Kulkarni, February 03, 2013, 02:35:17 PM

Previous topic - Next topic

Madhura Kulkarni

तिच्या विना घर सुने सारे, जसे सुने राधेविण गोकुळ
वृंदावन हे आसुसलेले, सूर वेणूचे झाले व्याकूळ

अंगणातला पारिजातही तिच्या स्मृतींनी बहरून जातो,
बघता बघता मंद सुगंधी तरुसुमानांनी भरते ओंजळ

सांजसकाळी झाडावरचा कोकीळ पक्षी सुरात गातो,
रातकिड्यांचे किरकिरणेहि तिच्यामुळे मज वाटे मंजुळ

सुंदर नाजूक फुल जणू ती, तयास मी ह्या हृदयी जपतो,
एकांतीही सोबत करतो, मनातला तो अखंड दरवळ

मनावरी या राज्य तिचे, अन तिचाच येथे हुकुम चालतो
उनाड भासे खट्याळ भासे , पण ती आहे खूपच प्रांजळ

सावलीतल्या निवांतवेळी आठवणींचा विळखा पडतो,
भूतकाळ मग उभा ठाकतो, मनात उठते भलती वर्दळ

छबी तिची बघ नयनी माझ्या, बघत राहतो, तल्लीन होतो,
तिच्या स्मृतींच्या पावसातला ओलावा हा निर्मळ, सोज्वळ

धुंद कळीच्या पाकळीपरी हवेत मी हि विहरत असतो
नजर तरी हि शोधत असते, तिला, तिला अन तिलाच केवळ

वाळवंट हे जीवन माझे जिथे बहरता वृक्षहि नसतो
जिथे तिथे मग दिसतो मृगजळ, क्षणात सारे होते निर्जळ

(हि माझी पहिलीच गझल आहे. सुधारणांचे स्वागत.)

kuldeep p

Mast aahe tumachi hi gazal
nice try mam.. :) :) :)

Madhura Kulkarni

Thanks  Praajdeep .   :)

Ankush S. Navghare, Palghar

Madhura ji khup chan ahe gazal. Zara guide karata ka? Hya prakarat nakki niyam kay asatat.

Madhura Kulkarni

#4
Thanks Prajunkush dada.
'गझल' या प्रकारात पहिल्या दोन ओळींना कवितेप्रमाणे यमक असते. पण बाकीच्या कडव्यांमध्ये दुसऱ्या ओळीलाच यमक असते.
गझलेत 'मात्रा' हा महत्वाचा प्रकार असतो. 'मात्रा' म्हणजे एका ओळीत जेव्हडे लघु आणि गुरु आहेत तेव्हडेच दुसऱ्या ओळीतही असावे लागतात.

लघु म्हणजे, काना-मात्रा, वेलांटी, उकार नसणारे अक्षर. जसेकी 'म', 'ग' आणि पहिली वेलांटी असणारे अक्षर, 'लि' 'ति' इ.
गुरु म्हणजे, जोडाक्षरे, काना-मात्र, दुसरी वेलांटी असणारे अक्षर....जसे कि, 'सो' 'के' वगैरे वगैरे.

दोन लघु अक्षर मिळून एक गुरु अक्षर मोजले जाते. इथे अक्षरांच्या संखे ऐवजी मात्रांची संख्या सारखी असणे महत्वाचे असते.
पहिल्या दोन ओळींना 'मतला' म्हणतात. आणि इतर कडव्यांना 'शेर'.
(मी हि नव्यानेच शिकली आहे.)

Ankush S. Navghare, Palghar

Thanks Madhuraji pan mla jamel ase vatat nahi. Bhalatach kathin disatey. Ani maze ganit kacche ahe. Aju ase kiti vegavegale itar prakar ahet. Any idea?
Dhanyavad.

Madhura Kulkarni

नाही, इतर प्रकारांची माहिती नाही. 'गझल'च नवीन आहे माझ्याकरता.

kuldeep p


deshpande Arpita


Madhura Kulkarni


deshpande Arpita, Thank you very much!