चारोळी

Started by Madhura Kulkarni, March 04, 2013, 03:11:34 PM

Previous topic - Next topic

sweetsunita66

धन्यवाद विजय तुम्हाला माझे लिखाण आवडते ,ऐकून बर वाटलं  :)

swara

#231
vijay siranshi sahmat  :)
sunita mam ,tumche likhan saral ani spasht aahe

sweetsunita66

धन्यवाद प्राची  :) :) :)

कवि - विजय सुर्यवंशी.

धन्यवाद प्राची....
आणी सुनिता असंच लिखाण ठेवा....

"साद देऊनी दाद मिळवता....
माझा मीच हरवलो....
रुसली सई माझ्यावर....
जणु मी तिला विसरलो...."
:D:D:D

sweetsunita66


"साद देऊनी दाद मिळवता....
माझा मीच हरवलो....
रुसली सई माझ्या..जणु मी तिला विसरलो...."

साद येता तुझी ओढ लागे मना ,
सांग कशी येऊ ठाव लागे जना ,
सई तुझी नाजुकशी डोळे मिटून धावी ,
बोचणाऱ्या बोलांचे काटे, मनी तिच्या घाव लावी

sweetsunita66

साद देऊनी दाद मिळवता....
माझा मीच हरवलो....
रुसली सई माझ्यावर....
जणु मी तिला विसरलो...."
:D:D :) :)

मिलिंद कुंभारे

साथ जरी  असेल एक
सोबती सखी  अनेक
शब्दात जरी प्रश्न एक
उत्तरे असतील ती अनेक .....

मस्तच..... :)

swara


कवि - विजय सुर्यवंशी.

सुनिता अतिशय छान सई चं उत्तर दिलंस.....

 
साद येता तुझी ओढ लागे मना ,
सांग कशी येऊ ठाव लागे जना ,
सई तुझी नाजुकशी डोळे मिटून धावी ,
बोचणाऱ्या बोलांचे काटे, मनी तिच्या घाव लावी...



"अंतरीच्या ओढिने संगम जाहला आपुल्या नात्याचा....
सई दुभंगुन कधी ते जाईल का....??
जरी बरसले बाण हे बोलांचे....
परी कवच हे प्रितीचे कुणी भेदेल का....??"

कवि-विजय सुर्यवंशी.
      (यांत्रिकी अभियंता)

मिलिंद कुंभारे

कवि - विजय सुर्यवंशी, prachi B, sweetsunita......

छान रंगलाय खेळ चारोळ्यांचा ...असेच खेळत राहा ...... मी मध्ये मध्ये येत राहील umpiring करायला ...... :D


जरी बरसले बाण हे बोलांचे....
परी कवच हे प्रितीचे कुणी भेदेल का....??"
छान...... :)