चारोळी

Started by Madhura Kulkarni, March 04, 2013, 03:11:34 PM

Previous topic - Next topic

kuldeep p

पाणी नव्हतेच ते

होता तुझ्या मिठीचा ओलावा

जाणवतोय अजूनही

सांग मी कसा विसरावा .........


:) :) :)

मिलिंद कुंभारे


Madhura Kulkarni

लाट उसळली पुन्हा एकदा,
भिजला सागर पुन्हा नव्याने
वेग तिचा, आवेग तिचा हा
तिजला सावर पुन्हा नव्याने......

मिलिंद कुंभारे


लाट अशीच उसळती राहू दे!
वेग तिचा असाच कायम राहू दे!

तुझ्या ओळी आवडल्यात!
मिलिंद कुंभारे



Madhura Kulkarni


kuldeep p

सावरू कसा मी

तुझ्या आठवणींच्या लाटांमधून 

बुडून जावेसे वाटते

तुझ्या हृदयरूपी सागरामधून ............
;)

Madhura Kulkarni


पत्र का लिहितेस तू?
मी वाचतो डोळे तुझे
अडकून हि मी मजेत का?
हे प्रेमाचे जाळे तुझे.....

केदार मेहेंदळे

kon mhnat ithe nav kavi aahet..... :)

kuldeep p

बघितले मीही डोळ्यात तुझ्या

प्रेमाच्या सुंदर अदा

प्रेम करतेस माझ्यावर

मग म्हणतेस का ग दादा
 

;) :D ::) :P

Madhura Kulkarni

#49
बापरे ! हि चारोळी काही पटली नाही मनाला.......

भावनांचे मोल हे
अनमोल रे....
हृदयी घुसले
बाण बनुनी बोल रे......