चारोळी

Started by Madhura Kulkarni, March 04, 2013, 03:11:34 PM

Previous topic - Next topic

kuldeep p

#60
अश्रून मधले भाव माझ्या

समझून घेतले नाही कोणी

वाहत डोळ्यातून असताना

पुसायला मात्र नाही कोणी  ................


:(

Madhura Kulkarni

कविवर्य - विजय सुर्यवंशी.,
नक्कीच तुम्ही सामील होऊ शकता. स्वागत आहे.

Madhura Kulkarni

@praajdip:
शब्दांशी खेळताना भावना सांभाळ रे.....
यमक जुळले म्हणून कविता लिहिणे तू टाळ रे.......

sylvieh309@gmail.com

hmmm na boltahi khup bolata yet  ;D

कवि - विजय सुर्यवंशी.



शब्दांच्या या खेळात ,,,
शब्द्च  बोलुन जातात .....
वेडया त्या भावना मग...

नाती तोलुन जातात...

         कवि - विजय सुर्यवंशी.
         (यांत्रिकी अभियंता)

Madhura Kulkarni

आरश्यात जेव्हा मी छबी न्याहाळत होते....
प्रतिबिंबाऐवजी मी तुजला पाहत होते.....
हसले गाली मी पण कळी तुझीच खुलली,
कितीवेळ मी तुजला पाहून लाजत होते......

मिलिंद कुंभारे


Madhura Kulkarni

धन्यवाद! तुझीही होऊन जाऊ दे कि एक चारोळी....

मिलिंद कुंभारे



हि चारोळी खास तुझ्या आग्रहास्तव!!!!!!!!!!! :) :) :)

बेधुंद :)

बेधुंद मी, बेधुंद तू;
बेधुंद सारी पानें फुलें;
अन,
बेधुंद वाहती भन्नाट वारे:
सांग सखी, मी छेडू कसे;
तुझ्या प्रीतीचे तराणे! :)

मिलिंद कुंभारे :) :) :)

मिलिंद कुंभारे

ती चारोळी आवडली नाही का, मधुरा ताई ???
तर पुन्हा एक चारोळी खास तुझ्या आग्रहास्तव!!!!!!!!!!!

स्तब्ध

स्तब्ध मी, स्तब्ध तू;
स्तब्ध सारी रानें वने;
अन स्तब्ध ते
नदीचे हिरवे किनारे;
प्रिये, तुज सांगू कसे;
मी, गुज माझ्या मनीचे!

मिलिंद कुंभारे