चारोळी

Started by Madhura Kulkarni, March 04, 2013, 03:11:34 PM

Previous topic - Next topic

Madhura Kulkarni

मला आवडली चारोळी पण इंटरनेट थोडावेळ बंद होत म्हणून रिप्लाय द्यायला वेळ लागला.

गोठले सारे कसे बघ,
गारवा हा छेडतो.....
डोळ्यात अजुनी झोप हि
क्षणात एका मोडतो....

kuldeep p

आजकाल काही सुचत नाही

शब्द माझे जुळत नाही

लिहायचे आहे बरेच काही

पण हात पुढे सरसावत नाही
:(

मिलिंद कुंभारे

Dear praajdeep!

khupach chan charoli lihilis! :) :) :)

Yogesh9889

khup chan jugal bandi suru aahe... :) :) :)

Madhura Kulkarni

#74
कळीचे फुल होतांना हवा आधार वेलीचा....
जरासा स्पर्श मायेचा, जिव्हाळा गार मातीचा.....

मिलिंद कुंभारे

प्रिय मधुरा ताई!!!! :) :) :) :) :)
अप्रतिम ओळी आहेत!
खूपच आवडल्यात!!!!
मिलिंद कुंभारे  :) :) :) :) :)

मिलिंद कुंभारे

प्रिय मधुरा ताई!!!!
तुझ्या दोन ओळींना;
माझ्या चार ओळी!
बघ तुला आवडतात का?


कळतच नाही;
हरवतो कुठे;
गंध ओल्या मातीचा;
अन केव्हा संपतो;
पावसाळा!

आता ग्रीष्म;
आयुष्याला चिकटलेला;
मंजिल जवळ असताना;
रस्ता मात्र लांबलेला!

तरीही तो मात्र आसुसलेला;
जणू
कित्येक दिवसांचा तहानलेला;
पुन्हा एकदा
त्याच पावसात चिंब भिजायला!
शोधीत पुन्हा
हरवलेला गंध तो ओल्या मातीचा!

मिलिंद कुंभारे :) :) :)

Madhura Kulkarni

मिलिंद दादा,
मस्त! खरच छान!

ओल्या ओल्या मातीमध्ये
रुजले रे बघ माझे मन,
अंकुर तयाला फुटताना,
फुलले रे बघ सारे वन

कवि - विजय सुर्यवंशी.

#78
आठवणीँचा हा खेळ रंगला.....
नात्यांचा तो दुरावा आज संपला.....
स्पर्श तुझा सखे अलवार तो.....
जणु मी जाहलो दवांनी ओला.....

Madhura Kulkarni

#79
ओलावा दवाचा,
फुलपानावर,
झेलत अंगावर
पावसाची सर.....