चारोळी

Started by Madhura Kulkarni, March 04, 2013, 03:11:34 PM

Previous topic - Next topic

sweetsunita66

#510
"किती बेभान पाउस,
आज भिजवतो मला..."
पाना पानातून थेंब टपोरे
अभिषेक घालितो धरेला ....

"किती बेभान पाउस,
आज भिजवतो मला..."
उल्हासी मन माझे
साद घाली तुला ,...



"किती बेभान पाउस,
आज भिजवतो मला..."
तुझी  अशी बेधुंद  वाणी
स्वप्न लोकी नेई मला .... सुनिता

sweetsunita66

"किती बेभान पाउस,
आज भिजवतो मला..."
पाना पानातून थेंब टपोरे
अभिषेक घालितो धरेला ....

"किती बेभान पाउस,आज भिजवतो मला..."
उल्हासी मन माझे
साद घाली तुला ,...



"किती बेभान पाउस,
आज भिजवतो मला..."
तुझी  अशी बेधुंद  वाणी
स्वप्न लोकी नेई मला .... सुनिता

sweetsunita66

सांभाळ बोलताना,
शब्द ते विषारी...
छेदून काळजाला
शर आरपार जिव्हारी ....सुनिता

Madhura Kulkarni

वाह, सुनिता.... मस्त!

भूषण,

"दूर गेलं म्हणून, कोणी गाव विसरत नाही...
शहराची शोभा मी हि मिरवत नाही...."

Bhushan Kasar

"दूर गेलं म्हणून, कोणी गाव विसरत नाही,
आपली माणस आठवली की रडू आवरत नाही."

Madhura Kulkarni

पावसात भिजूनही, मन हे कोरडे....

Bhushan Kasar

"पावसात भिजूनही, मन हे कोरडे,
प्रत्येक थेंबात पावसाच्या शोधते मात्र तुला ते"

ap01827

"पावसात भिजूनही, मन हे कोरडे,
तहान भागली तरी चातक ही ओरडे

      संदीप लक्ष्मण नाईक

Bhushan Kasar

धडपडणाऱ्या जीवाला अन् दुभंगलेल्या मनाला .....

ap01827

धडपडणाऱ्या जीवाला अन् दुभंगलेल्या मनाला .....
मृत्यू शिवाय काही दिसत नाही आता तरी या क्षणाला .....

                संदीप लक्ष्मण नाईक