चारोळी

Started by Madhura Kulkarni, March 04, 2013, 03:11:34 PM

Previous topic - Next topic

kuldeep p

दूर गेल्याने
किंमत कऴते प्रेमाची
जवळ आल्याने
दूरावती नाती माणसाची

ap01827

आपल्या दोघांच एकमेकाशी
                            अतूट नातं आहे
हे सर्वाना सांगण्यासाठी पाणी
                            नदीचं वहात आहे
                         
                          संदीप लक्ष्मण नाईक 
 

कवि - विजय सुर्यवंशी.

प्रिय सई.....
[/color].
[/color].
[/color]नाती तुझी माझी प्रेमाची,
[/color]रेशीम धाग्यांनी विणलेली...
[/color]मावळतीच्या प्रभाकराने जशी...
[/color]वेडी संध्या खुललेली....
[/color].
[/color].
[/color]आसवांचे साज अन भावनेचे गाज,
[/color]जशी ही वसुंधरा गहिवरलेली...
[/color]अनोख्या ऐश्या त्या मिलनाला,
[/color]जशी रात्र ती मंतरलेली.....
[/color].
[/color].
[/color]   विजय सुर्यवंशी.
[/color](यांत्रिकी अभियंता)

kuldeep p

तीच्याशी हसता हसता
रडलो कधी समझलेच नाही
तिच्या बरोबर चालता चालता
हरवलो कधी समझलेच नाही

sweetsunita66

खूप छान चाललय !!!!!

कश्या सांज वेळी प्रभाकराने
छटा पसरविल्या किरणांच्या
कश्या  बाहू पाशात अडकल्या
प्रेम भावना प्रियतमेच्या


कशी धरीत्रीच्या प्रेमाची चाहूल
अलगदच लागली त्या  चंद्राला
म्हणूनच का चांदण्यांचा वर्षाव
केला वसुधेच्या तनुला सजवायला....
                                              सुनिता 

ap01827

एक हायकू...

तुला पाहून
वसंता, ही वसुधा
नवरी नवी !

संदीप लक्ष्मण नाईक

कवि - विजय सुर्यवंशी.


खूप छान चाललय !!!!!

कश्या सांज वेळी प्रभाकराने
छटा पसरविल्या किरणांच्या
कश्या  बाहू पाशात अडकल्या
प्रेम भावना प्रियतमेच्या


कशी धरीत्रीच्या प्रेमाची चाहूल
अलगदच लागली त्या  चंद्राला
म्हणूनच का चांदण्यांचा वर्षाव
केला वसुधेच्या तनुला सजवायला....
                                              सुनिता
.
.
.
.
So nice one...


Madhura Kulkarni

टाळू नकोस आता,
सांगू नको बहाणे,
मी सोडवीत आहे,
सारे तुझे उखाणे...

तू न बोलताही
मज कळून गेले....
हे प्रेम ना खरे रे,
मी कळवळून गेले....

शिवाजी सांगळे


टाळायचे अन सोडवायचे
का आता, लटके बहाणे,
भेटलात सारे पुन्हा
आहे प्रेम हे पुराणे !!
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

ap01827

#499
         आज मी सुध्दा येणार नाही
     पाऊस पण खूप अति शहाणा आहे
          तो आला तरच मी येईन
    मला न भेटण्याचा तुझा बहाणा आहे

              संदीप लक्ष्मण नाईक