चारोळी

Started by Madhura Kulkarni, March 04, 2013, 03:11:34 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

मित्रा, लिहित रहा
लिहिण्याने मन मोकळे होते,
मित्रानॉ, लिहित रहा
आभाळ पुन्हा भरून येते !!


शिव.....
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

kuldeep p

पहील्याच नजरेत असे काय केले
मनाला माझ्या वेड तुझे लागले
तुझ्या डोळ्यात सवतःला हरवून गेले
नजरेच्या बंदिशाळेत बंद झाले

Madhura Kulkarni

जग हे मृगजळ भासे....
क्षणात उलटे फासे....
हा डाव टाकतो कोणी,
अन पाहून नियती हासे....

sweetsunita66

#483
 या स्वप्न लोकी  जगती
मृगजळाचे जाळे असती
नसे कुणी लक्ष्मण  आता
सीतेस वाचविण्या जगती

कवि - विजय सुर्यवंशी.


या स्वप्न लोकी  जगती
मृगजळाचे जाळे असती
नसे कुणी भरत आता
सीतेस वाचविण्या जगती
.
.
.
छान  .
.
रक्षण्या सीतेला या जगी,
पुन्हा भरत येतील...
संहार् करण्या दुष्टांचा,
पुन्हा श्रीराम अवतरतील....
.
.
दुमदुमुन जातील सार्‍या दिशा,
पुन्हा रामनामाचे गजर होतील....
गर्द त्या अंधारात आता,
आशेचे प्रभाकर् येतील....
.
.
विजय  सुर्यवंशी....

शिवाजी सांगळे

म्हणतात कि आशेवर
दुनिया कायम आहे,
आहे अस्तित्व रावणाचे
म्हणूनच रामही आहे !



शिव....
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

sweetsunita66

verrrry nice,vijay n  shiwaji,,,,,




आशेवर जगण्याने
पाऊले पुढे पडतात
मनीच्या विश्वासावर
अप्रतिम कार्य घडतात

vijaya kelkar

               प्रबळ तृष्णा लागे मृगास
               धावे जवळ करण्या भासास
               सीतेची आस रावणास
               हाका मारती रामास

शिवाजी सांगळे

रावणास आस होती सीतेची
घेतली मदत त्याने मृगाची,
म्हणूनच सत्य आले पुढे,
असे व्यर्थ आस मृगजळाची !!

धरावी कास सदा सत्याची
तारून घेते नाव जीवनाची,
गेले सागून सारे संत-महंत
जावो ना व्यर्थ वारी जन्माची !!


शिव......
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

प्रशांत पवार

अशी कशी ही नाती गं...
ह्र्द्याच्या तारांनी जोडलेली...
दुर गेली कुणी तोडूनी..
तरी ती एकमेकात जखडलेली..
©*मंथन*™...