चारोळी

Started by Madhura Kulkarni, March 04, 2013, 03:11:34 PM

Previous topic - Next topic

Madhura Kulkarni

मस्त ग सुनिता दि !!!!

शिवाजी दा, कविता छान आहे...मुंबईवरची कविता भलतीच मोठ्ठी आणि तिथलं बदलत वातावरण त्यात छान दाखवलं आहे.......पण व्हिडिओ टाकणाऱ्याचे नाव वेगळचं का आहे????

sweetsunita66

आभारी आहे ,मधुरा .

शिवाजी सांगळे

मधुरा, तुझी प्रतिक्रिया योग्य आहे, विडीयो माझ्या मुलाने म्हणजे "रोहन सांगळे" याने you tube वर अपलोड केला, कारण त्या बद्दल मला technical तितकं लक्षात आल नव्हत म्हणून हा घोळ.... बाकी काहि नाही, तू आठवणीने विडीयो पाहिलास त्या बद्दल धन्यवाद !
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

Madhura Kulkarni

शिवाजी दा,

मुंबईवर व्हिडिओ शूट करून त्यावर कविता आणि त्यावर केलेली भाष्य हा एक छान प्रयोग होता.
असे नवे प्रयत्न करणाऱ्यांच नेहमीच कुतूहल वाटत मला....खूप छान आहे. असे नवीन प्रयोग नक्की करत राहा.

शिवाजी सांगळे

मधुरा, मनापासून धन्यवाद ..... असाच लोभ राहू दे!
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

Madhura Kulkarni

#465
आता माझा एक मुक्तछंद......


का बांधून ठेवले आहे मला? ? ? ?
माझे पंख तर केव्हाच छाटून टाकलेले आहेत तुम्ही.....
आकाशात उंच भरारी घेण्याचे स्वप्नसुद्धा पडत नाहीत मला आजकाल.....

झाडाच्या फांदीवरच्या घरटे,
ते हवे तिथे हवे तसे उडण्याचे स्वतंत्र.....
सारे काही कधीच हिरावून घेतलेले आहेत....
 
एक मात्र समाधान आहे,
आता काहीच नाही उरलेलं माझ्याजवळ गमावण्यासारख....
काहीच नाही....


पण मला अजुनी कळत नाही हो.....
मी जागचा हलूही शकणार नाही अशी खात्री झाली तरीही...
तरीही अजून का बांधून ठेवले आहे मला? ? ? ?

sweetsunita66

छान ह मधुरा !!!!!!!!!

Madhura Kulkarni

सुनिता दि,  धन्यवाद!!!

आता तुझी पाळी....
लवकर पाठव चारोळी !!!! :)

sweetsunita66

मधुरा हे तुझ्यासाठी  :) :) :)
जरी पक्षी असे तो बिचारा अन बिन पराचा ,
तरी आत्मविश्वास त्याचा असे पराकोटीचा
जर प्रयत्ने रगडीता वाळूतुनही तेल गळे
तर साहस अन चिकाटीतूनही  सफलता मिळे  :) :)

शिवाजी सांगळे

©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९