चारोळी

Started by Madhura Kulkarni, March 04, 2013, 03:11:34 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

आठवणीची साठवणी
सवय हि चांगली खरी,

चांगली म्हातारी शेवरीची
हवेत तरंगते अधांतरी !

रागवायचं नाही मधुराजी... तुम्ही अशाच लिहित रहा.
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

मिलिंद कुंभारे

#441
शिवाजी, मधुरा.....
छान.... :)

आता मी ....

तुला विसरण्याचे ठरवले जरी मी
मनाने कधी ते सुचवलेच नाही ......

तुला आठवू पाहतो मी, अता का?
जरी गूढ सारे उमगलेच नाही .....

शिवाजी सांगळे

#442
वा.. छान मिलिद,

विसरायचे कसे आपण?
हे नियतीलाच ठरवू दे,

आपल्यात मात्र प्रेम,
चिरंतन असेच राहू दे !
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

मिलिंद कुंभारे

शिवाजी,

kya baat...... :)

शिवाजी सांगळे

©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

Madhura Kulkarni

#445
Too good brothers!! :)

शिवाजी सांगळे

#446
I dont know r u  younger or older? even though, thanks sis..... shivajida
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

sweetsunita66

छान !मधुरा मिलिंद अन शिवाजी,,
छान चाललाय खेळ अवीट  चारोळ्यांचा 
अप्रतिम  शब्द बंध जुळती ,आरसा हा मनाचा
,माय बोलीचा हा प्रवाह निरंतर असाच वाहू दे
,अभिमान मराठीचा मनोमनी असाच राहू  दे...

शिवाजी सांगळे

धन्यवाद ......

स्वीट कमेंट, सुनिता, 
आली आता तुझी  चारोळी,
राहिली शिल्लक पुन्हा
मधु अन मिलीदाची खेळी !

©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

sweetsunita66

धन्यवाद शिवाजी !!
   मिलिंद अन मधुरा mk चे दोन नगीने
   एक स्वाध्यायात गुंतली दुसऱ्याचे  कार्यालयीन देणे 
   तरी,कवितांचा आस्वाद देतात आपल्याला
   सृजनशील जबाबदारी प्रस्तुत करुनी आपुलकीने