चारोळी

Started by Madhura Kulkarni, March 04, 2013, 03:11:34 PM

Previous topic - Next topic

Madhura Kulkarni

लाज वाटण्याची काहीच गरज नाही. तू चांगल्या कविता करतेस कि!!

मिलिंद कुंभारे


Madhura,

नाजूक होते फुल जे,
ते कोरडे पाषाण झाले....

kya baat...... :)

Madhura Kulkarni


मिलिंद कुंभारे

#433
कळेना कधी गुंतले, संपले मी
तरीही कुठे बावरी, चालले मी ...

जराशी जराशी अता राहिले मी
व्यथा, वेदनांनी जणू वेढले मी ...

मिलिंद कुंभारे

शिवाजी सांगळे

चांगली जुगलबंदी जमली काव्याची,
वाढ होईल मराठी साहित्याची !
निखळ गोडी वाढवा प्रेमाची,
वृद्धी होत राहो मायमराठीची !
!

©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

Madhura Kulkarni

वा!!!

धागा कवितेचा
जोडतो मराठीला,
जमलो कवी सारे,
मायबोली जपायला.....


शिवाजी सांगळे, स्वागत आणि धन्यवाद!!

शिवाजी सांगळे

मधुराजी तुम्हाला पण धन्यवाद... छान लिहिता...
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

मिलिंद कुंभारे

शिवाजी सांगळे......

छान,
चारोळ्या मध्ये आपले स्वागत आहे ......  :)

शिवाजी सांगळे

छोटासा प्रयत्न आता करतो आहे,
चुकलच काहि! तुम्हीच सावरायचे आहे !!
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

Madhura Kulkarni

शिवाजी,
मिलिंद दा,

मस्त!!
__________


आता कवितेच्या ओळी.....


साठवलेल्या आठवणी या,
नयनांतून झरती क्षणोक्षणी....
एकटी पडते अशी कि
भटकत फिरते अधांतरी.....