कवितांना शुन्य प्रतिसाद!

Started by मिलिंद कुंभारे, March 19, 2013, 02:03:19 PM

Previous topic - Next topic

Mayur Dikte

मिलिंद  तुम्ही बरोबर सांगितलं

Radha Phulwade

मला वाटतं प्रत्येक कवितेला आपण प्रतिसाद दिला पाहिजे जेणेकरून तो नवोदित कवी अधिकाधिक चांगलं  लिहायचा प्रयत्न करील!

Sachin01 More

Motivation hi khup mothi takad ahe .mala vatat jar kavitana pratisad dila tar Poets na ankhi Prerana bhetate. TAS TAR AAVAD ASANARYA POETS NA KUTHLYAHI PRATISADACHI GARAJ NASATE AS ME MANTATO PAN JAR PRATISAD DYAYALA kahi harakat nasavi mitrano.               Sory jyana He Suggestion nahi avdle
Moregs

Radha Phulwade

मी सहमत आहे तुझ्या मताशी... milind

सतिश

हे संभाषण सुरु करण्यासाठी श्री मिलिंद कुंभारे यांचे आभार.. तुम्ही आपली बाजू अगदी योग्य मांडली आहे.. तुम्ही मांडलेले मत -- "आपण प्रत्येक कवितेला प्रतिसाद द्यायला पाहिजे, मग ती चांगली कविता असेल तर प्रश्नच नाही पण एखादी कविता चुकली असेल तर त्यात काय चुकले हेही अनुभवी अभ्यासकांनी निदर्शनास आणून द्यायला हवे असे वाटते. तसेच त्यात दुरुस्तीही सुचवावी म्हणजे तो कवी दुसरी कविता नक्कीच चांगली लिहायचा प्रयत्न करेल. आणि नवकवीनीही त्यात कमीपणा मानू नये कारण माणूस चुकता चुकताच शिकत असतो. चूक हीच यशाची पहिली पायरी समजावे!" हे अगदी योग्य आहे व मलाही असेच वाटते.. कि कवींनी इतर कवींना त्यांच्या चुका त्यांना कमीपणा न वाटता आणखी हुरूप येईल अशा प्रकारे समजावून द्यायला हव्यात.. तेव्हाच त्यांचा कवितांचा दर्जा सुधारेल व उत्तम कविता लिहिल्या जातील.. कारण प्रत्येक जन आपल्या कडून चांगले लिहिले जावे असे मनापासून प्रयत्न करत असतो.. त्यांना मदतीची, चांगल्या सामिक्षणाची गरज असते.

त्यामुळे आम्हाला मदत करावी हि सर्वांना नम्र विनंती..

मिलिंद कुंभारे


"आपण प्रत्येक कवितेला प्रतिसाद द्यायला पाहिजे, मग ती चांगली कविता असेल तर प्रश्नच नाही पण एखादी कविता चुकली असेल तर त्यात काय चुकले हेही अनुभवी अभ्यासकांनी निदर्शनास आणून द्यायला हवे असे वाटते. तसेच त्यात दुरुस्तीही सुचवावी म्हणजे तो कवी दुसरी कविता नक्कीच चांगली लिहायचा प्रयत्न करेल. आणि नवकवीनीही त्यात कमीपणा मानू नये कारण माणूस चुकता चुकताच शिकत असतो. चूक हीच यशाची पहिली पायरी समजावे!"